कालाहांडीतील 'पॅड वुमेन' करत आहेत सॅनिटरी नॅपकीनबाबात महिलांमध्ये जागृती
कालाहांडी (ओडिशा) - आजकाल महिलांच्या जबाबदाऱ्यांमध्ये वाढ झाली आहे. घरासोबतच बाहेरची कामेही महिला सक्षमपणे करू लागल्या आहेत. दिवसरात्र कुटुंबातील सर्वांच्याच सुख-दुःखाची काळजी घेणाऱ्या या महिला, मासिक पाळीतील आपल्या वेदना मात्र लपवून ठेवतात. याबाबतीत कित्येक सामाजिक संस्थांनी आणि सरकारनेही जागरुकता मोहिमा सुरू केल्या आहेत. मात्र, अद्यापही पाळीदरम्यान सॅनिटरी नॅपकिन, म्हणजेच पॅडचा वापर करण्याचे प्रमाण फारच कमी आहे. मासिक पाळी ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे, त्यामुळे त्याचा बाऊ न करता, उलट त्या काळात महिलांचा त्रास कमी व्हावा यासाठी कालाहांडी येथील भुवनेश्वर बेहरा युवा संघटनेने पुढाकार घेतला आहे. या संघटनेतील ९० हून अधिक महिला आणि विद्यार्थिनी सॅनिटरी नॅपकीन तयार करतात, आणि ग्रामीण भागामध्ये ते वापरण्यासंबंधी जनजागृतीही करतात.