दिल्ली शेतकरी आंदोलन : 'ई टीव्ही भारत'च्या दिल्लीतील प्रतिनिधींसोबत सविस्तर चर्चा - कृषी कायदे रद्द करा
नवी दिल्ली - केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात सुरु असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा आज १४वा दिवस आहे. शेतकऱ्यांनी काल (८ डिसेंबर) पुकारलेल्या भारत बंदला देशभरातून उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. त्यानंतर रात्री केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी शेतकऱ्यांच्या एका शिष्टमंडळाला चर्चेसाठी बोलावले होते. मात्र, ही बैठक निष्फळ ठरली. त्यानंतर सरकार आणि शेतकऱ्यांमध्ये आज होणार असलेली पूर्वनियोजित बैठकही रद्द करण्याचा निर्णय कृषी संघटनांनी घेतला आहे. तसेच विरोधी पक्षांच्या शिष्टमंडळाने आज राष्ट्रपतींची भेट घेत हे कायदे मागे घेण्याची विनंती केली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात हे आंदोलन तीव्र होण्याची शक्यता आहे. यासर्व घडामोडींसंदर्भात 'ई टीव्ही भारत'चे दिल्लीतील प्रतिनिधी गौतम यांच्यासोबत साधलेला सविस्तर संवाद...