शेतकऱ्यांमध्ये भीती आणि भ्रम निर्माण करण्याचा विरोधकांचा प्रयत्न : मुख्तार नक्वी - मुख्तार नक्वी ईटीव्ही भारत
नवी दिल्ली : केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात शेतकरी संघटनांनी पुकारलेल्या 'भारत बंद'ला देशभरातील सुमारे १२ विरोधी पक्षांनी आपला पाठिंबा दिला होता. यावरुन केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. काँग्रेस आपल्या काळात या सुधारणांचे समर्थन करत होती, मात्र आता याचा विरोध करत आहे. विरोधी पक्षातील नेते हे शेतकऱ्यांमध्ये या कायद्यांवरुन भीती आणि भ्रम निर्माण करत आहेत, असा आरोप नक्वींनी केला. पाहा ईटीव्ही भारतशी नक्वींनी केलेली विशेष चर्चा...