उत्तराखंडमधील आजीबाईंची शाळा! - उत्तराखंड आजीबाई शाळा व्हिडिओ
हैदराबाद - उत्तराखंडच्या उत्तरकाशीमध्ये एके काळी घराचा उंबराही न ओलांडलेल्या महिला आता घराबाहेर पडून लिहायला आणि वाचायला शिकत आहेत. दिवसभर घरातील नेहमीची कामे आटोपून, संध्याकाळ होताच या आजी आपल्या मैत्रिणींसोबत पारावर येतात. सर्व आपल्यासोबत आपापले पुस्तक, पेन्सिल आणि भरपूर असा उत्साह घेऊन येतात. या खास शाळेसाठी उत्तरकाशी जिल्हा प्रशासनाने पुढाकार घेतला होता. प्रशासनाच्या या उपक्रमाला गावातील महिलांनीही चांगला प्रतिसाद दिला.