पांढऱ्या भोपळ्यापासून तयार होणारे 'ओडिशा शिल्प' - पांढरा भोपळा ओडिशा शिल्प न्यूज
हैदराबाद - दक्षिण ओडिशातील जिल्ह्यांमध्ये आदिवासी लोकांच्या दैनंदिन जीवनात पांढरा भोपळा विविध कारणांसाठी वापरला जातो. आदिवासी लोक या भोपळ्याचा उपयोग जेवणाचा डबा आणि पाण्याची बाटली म्हणून करतात. इतकेच नाही तर यापासून संगीत वाद्ये देखील तयार केली जातात. मात्र, काळाच्या ओघात या पांढऱया भोपळ्याचे महत्त्व कमी होत चालले आहे. मात्र, रायगड शहरातील प्रसिद्ध कलाकार हिमांशु शेखर पांडिया यांनी आपल्या ब्रश आणि रंगांचा वापर करून भोपळ्यांपासून विविध कलाकृती तयार केल्या आहेत. या कलाकृतींच्या माध्यमातून त्यांनी निरुपयोगी समजल्या जाणाऱया भोपळ्यांना उत्पन्नाचे साधन बनवलेय. हिमांशू यांनी आदिवासी तरुणांना या कलेचे प्रशिक्षिणही दिले आहे. कलेच्या माध्यमातून रोजगार मिळत असल्याने प्रशिक्षण मिळालेले कलाकार आनंदी आहेत.