विशेष मुलाखत: 'सर्वांनाच सिनेमात काम करण्याची संधी मिळत नाही' - suneil shetty interview
बॉलीवूड स्टार सुनील शेट्टी याच्याशी 'ईटीव्ही भारत'चे पत्रकार पराग चापेकर यांनी संवाद साधला. या मुलाखतीत सुनील शेट्टीने नागरिकांनी डिजिटल काळाला सामोरे जाण्याची तयारी केली असून हे डिजिटलायझेशन स्वीकारल्याचे सांगितले. यावेळी सुनील शेट्टीने बॉलीवूडच्या सद्यपरिस्थितीवर भाष्य केले. बॉलीवूडमध्ये ठराविक अभिजन (एलीट क्लास) व्यक्तींव्यतिरिक्त कोणालाही संधी मिळत नसल्याचा आरोप त्याने केला. तसेच गुणवत्ता प्रदान आणि दर्जेदार कलाकृतींना योग्य व्यसपीठ मिळत नसल्याची खंत व्यक्त केली.