उत्तराखंडमध्ये मुसळधार; भूस्खलनामुळे मसूरी-देहरादून महामार्ग बंद - उत्तराखंडमध्ये मुसळधार
मसूरी (उत्तराखंड) - उत्तराखंडमध्ये मागील 12 तासापासून पावसाची तुफान बेटिंग सुरू आहे. मुसळधार कोसळत असलेल्या पावसामुळे मसूरी- देहरादून या महामार्गावर अनेक ठिकाणी भूस्खलनाच्या घटना घडल्या आहेत. तर पावसामुळे या महामार्गावरील संपूर्ण वाहतूक ही ठप्प झाली आहे. महामार्गावर गलोगी पावर हाउस परिसरात दरडी कोसळल्याच्याही घटना घडल्या आहेत. महामार्ग बंद करण्यात आल्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी मोठ्या प्रमाणात वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या आहेत.