बिहारमधील मशरूम लेडी 'वीणा देवी'; पलंगाखाली केली मशरूम शेतीची सुरूवात - मशरूम लेडी
सध्या असे एकही क्षेत्र नाही की ज्याठिकाणी महिलांनी सहभाग घेतलेला नाही. ज्या क्षेत्रांमध्ये फक्त पुरुषांचेच वर्चस्व होते, अशा ठिकाणी देखील महिलांनी आता आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. अगदी शेतीसारख्या कष्टाच्या अन् जोखमीच्या व्यवसायातही अनेक महिलांनी उत्तम काम करून दाखवले आहे. शेतीच्या माध्यमातून आपल्या कुटुबांचा गाडा यशस्वीपणे पुढे चालवला आहे. मशरूम लेडी वीणा देवी यांचा अशाच महिलांमध्ये समावेश होतो. वीणा यांनी पलंगाच्या खाली मशरूमची शेती सुरू केली आणि आज त्यांना पूर्ण देशात मशरूम लेडी म्हणूनच प्रसिद्धी मिळवली आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी त्यांचा सन्मान केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी अन् बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार यांनी देखील वीणादेवींचे कौतुक केले आहे.