केंद्र सरकारकडून लस वाटपात दुजाभाव केला गेला - खासदार राऊत - MP Vinayak Raut in Parliament
केंद्र सरकारकडून लस वाटपात दुजाभाव केला गेला, असा आरोप खासदार विनायक राऊत यांनी लोकसभेत केले आहे. ते म्हणाले, केंद्र सरकारने भाजपची सत्ता ज्या राज्यात आहे, त्या राज्यात मोठ्या प्रमाणात लस पुरवठा करण्यात आला. मात्र, ज्या राज्यात भाजपाची सत्ता नाही, त्या राज्यात लसीचा पुरवठा कमी करण्यात आल्याचे ते म्हणाले. उत्तर प्रदेश राज्यात निवडणुका असल्यामुळे व भाजपची सत्ता असल्यामुळे 16 कोटी 38 लाख 12 हजार 323 लसींचा पुरवठा करण्यात आला. गुजरातमध्येही भाजपची सत्ता असल्यामुळे 8 कोटी 15 लाख 25 हजार 236 लसींचा पुरवठा करण्यात आला आहे. मात्र, महाराष्ट्राची लोकसंख्या 13 कोटी असताना भाजपची सत्ता नसल्यामुळे केवळ 11 कोटी 52 लाख 43 हजार लसींचा पुरवठा करण्यात आल्याचे खासदार राऊत म्हणाले.