शेतकऱ्यांना हेक्टरी 30 हजार रुपयांची मदत द्या, अन्यथा.. नवनीत राणांचा मुख्यमंत्र्यांना इशारा - crop under water navneet rana demand help
दिल्ली - महाराष्ट्रातील काही भागांना मुसळधार पावासाने चांगलेच झोडपून काढले. त्यामुळे, शेतकऱ्यांनी कष्टाने उगवलेले पीक पाण्याखाली आले आहे. त्यांना मदतीची मागणी होत आहे. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी देखील नुकसानग्रस्तांना मदत करण्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली आहे. शेतकऱ्यांना हेक्टरी 30 हजार रुपयांची मदत द्या, अन्यथा मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर आंदोलन करू, असा इशारा नवनीत राणा यांनी दिला.