अशी ही भूतदया! भटक्या जनावरांना सांभाळणारा माजी वायुसेना अधिकारी - वायुसेना अधिकारी भटके प्राणी पालकत्व बातमी
देहराडून - फर्राटेदार इंग्रजी बोलणारे मोहम्मद शोएब आलम कधी काळी भारतीय वायुसेनेत अधिकारी होते. आता ते एका पत्र्याच्या झोपडीवजा घरात राहतात. मोहम्मद उदरनिर्वाहासाठी जी काही कमाई करतात ती सर्व भटक्या प्राण्यांसाठी खर्च करतात. मसूरीच्या हाथीपाव भागात एकाकी राहणाऱ्या मोहम्मद शोएब यांना आपल्या आयुष्याबद्दल काहीही तक्रार नाही. त्यांनी आता भटक्या श्वानांना आणि जनावरांनाच आपले मानले आहे. मुक्या प्राण्यांसोबत आपला वेळ घालवणे त्यांना जास्त आवडते.