महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

VIDEO : गाडीवरुन पळून जाणाऱ्या मोबाईल चोरांना तरुणाने दिली धडक; पुढे काय झाले पाहा.. - दिल्ली मोबाईल चोर व्हिडिओ

By

Published : Jan 28, 2021, 5:37 PM IST

नवी दिल्ली : न्यू उस्मानपूर भागामध्ये एका व्यक्तीचा मोबाईल घेऊन पळून जाणाऱ्या चोरांना पकडण्यासाठी एका तरुणाने दाखवलेले प्रसंगावधान कामी आले. यानंतर मोबाईल चोरणाऱ्या एका व्यक्तीला पकडून नागरिकांनी मजबूत चोप दिला, तर त्याचा साथीदार पळून जाण्यात यशस्वी ठरला. हा सर्व प्रकार गल्लीमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाला. व्हिडिओमध्ये दिसून येत आहे, की स्कूटीवरुन येणाऱ्या दोघांनी रस्त्याने जाणाऱ्या एका व्यक्तीचा मोबाईल घेऊन पुढे निघून जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्या व्यक्तीसह आणखी एका व्यक्तीने त्यांचा पाठलाग केला. तर, समोर उभा असलेल्या एका तरुणाने हे पाहताच, येणाऱ्या चोरांना धक्का देत खाली पाडले. त्यानंतरही त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र आजूबाजूच्या लोकांनी त्यांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. पाहा हा थरार...

ABOUT THE AUTHOR

...view details