वीज चोरीची चौकशी करायला गेलेल्या पथकाला बेदम मारहाण, पाहा व्हिडिओ - वीज चोरी व्हिडिओ
राजस्थानातील जवाहर जिल्ह्यातील लाडपूरा बलराम गावात वीज चोरीची चौकशी करायला गेलेल्या पथकावर गावकऱ्यांनी हल्ला केला. नागरिकांच्या जमावाने वीज विभागाच्या कर्मचाऱ्यांना लाठ्या काठ्यांनी मारहाण केली. महिला, लहान मुले, महिला वीज विभागाच्या कर्मचाऱ्यांना मारहाण करताना व्हिडिओ समोर आला आहे. एका प्रत्यक्षदर्शीने घटनेचा व्हडिओ काढला असून यात कर्मचारी गावकऱ्यांच्या तावडीतून सुटका करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. गावकऱ्यांनी सरकारी गाड्यांची तोडफोडही केली. पाहा व्हिडिओ