बिहारच्या मितालीने सर केला दक्षिण अमेरिकेचा सर्वोच्च आकोंकागुआ पर्वत - Aconcagua mountain
नालंदा : जिल्ह्यातील मायापूर येथील मिताली प्रसाद हिने दक्षिण अमेरिकेतील अँडीज पर्वतश्रृंखलेतील सर्वात उंच पर्वत आकोंकागुआ सर करुन जागतिक विक्रम प्रस्थापित केला आहे. एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेली मिताली लहानपणापासूनच धाडसी आहे. मिताली कराटेमध्ये ब्लॅक बेल्ट आहे. जगातील सर्वात उंच सात पर्वतांवर चढाई करण्याचे तिचे स्वप्न होते. तिने आत्तापर्यंत कांचनजंघा, टायगर हिल्स आणि किलिमंजारो पर्वताचे शिखर सर केले आहे.