Uday Samant Resolution 2022 : 'ओमायक्रॉनचा प्रादुर्भाव वाढू न देणे हाच संकल्प' - उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांचा नवीन वर्षे संकल्प
मुंबई - राज्यात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. ओमायक्रॉनचा धोका देखील वाढत चालले आहे. त्यामुळे पुढच्या वर्षी सर्वांसाठी महत्त्वाचा संकल्प म्हणजे ओमायक्रॉनचा प्रादुर्भाव आपल्या आजूबाजूला वाढू देऊ नये. आरोग्याच्या दृष्टीने पुढील वर्ष सर्वांना चांगला जावो. या विषाणूचा प्रसार कुठे होऊ नये याची दक्षता विद्यार्थ्यांनीही पुढील वर्षात घेतली पाहिजे, अशी भावना उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी ईटीव्ही भारतशी बोलतांना व्यक्त केली आहे.