मोदी मंत्रिमंडळ २.० मध्ये 'या' मराठी चेहऱ्यांनी स्वीकारला पदभार - या मराठी चेहऱ्यांनी स्वीकारला पदभार
नवी दिल्ली - केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात ४३ मंत्र्यांमध्ये ३६ नवीन चेहरे आहेत. विस्तारित मंत्रिमंडळामधील मंत्र्यांनी आज पदभार स्वीकारला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील नारायण राणे, रावसाहेब दानवे, डॉ. भारती पवार, डॉ. भागवत कराड आणि कपिल पाटील या नेत्यांचा समावेश आहे. या मराठी चेहऱ्यांनी आज आपल्या खात्याचा पदभार स्वीकारला.