VIDEO : अन् रस्त्यावर आला हत्तींचा कळप; लोकांना पळता भुई थोडी.. - आसाम हत्ती रस्त्यावर
दिसपूर : आसाममधील हत्ती आणि लोकांमधील संघर्ष वाढत चालला आहे. दर दिवसाआड एखाद्या व्यक्तीवर हत्तीने हल्ला केल्याच्या घटना घडत आहेत. अशातच आता आणखी एक थरारक व्हिडिओ समोर आला आहे. राज्याच्या गोलाघाटमध्ये हत्तींचा एक कळप रस्त्यावरुन जाताना दिसत आहे. अन्नाच्या शोधात असलेला हा कळप शेतीचे नुकसान करताना दिसून येत आहे, तर नागरिकांनाही त्यामुळे पळता भुई थोडी झाल्याचे दिसत आहे. अखेर काही काळानंतर हा कळप जंगलात गेल्यानंतर परिसरातील लोकांनी सुटकेचा निश्वास सोडला. पाहा हा व्हिडिओ..