VIDEO : सर्वाेच्च न्यायालयासमोर एका दाम्पत्याचा आत्महनाचा प्रयत्न - attempt to suicide in front of supreme court gate
नवी दिल्ली - सोमवारी दुपारी सर्वोच्च न्यायालयाच्या गेट क्रमांक डीच्या बाहेर एका पुरुष आणि महिलेने स्वतःला जाळण्याचा प्रयत्न केला. मात्र, जवळच असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी तातडीने आग विझवली आणि दोघांनाही राम मनोहर लोहिया रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. सध्या दोघांवर उपचार सुरू असून पोलीस संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत.