महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

मध्यप्रदेशातील विदिशामध्ये विहिरीचा कठडा तुटला; चौघांचा मृत्यू, बचावकार्य सुरू

By

Published : Jul 16, 2021, 12:30 PM IST

Updated : Jul 16, 2021, 12:39 PM IST

विदिशा- मध्यप्रदेशातील विदिशा जिल्ह्यात गंजबासौदा येथील लाल पठार परिसरातील एका विहिरीचा कठडा ढासळल्याने जवळपास 40 नागरिक विहिरीत पडल्याची घटना गुरुवारी घडली. या घटनेत आतापर्यंत 4 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. तसेच 25 जणांचा जीव वाचवण्यात प्रशासनाला यश आले आहे. घटनेची माहिती मिळताच एनडीरआफ आणि एसडीआरएफ पथक घटनास्थळी तत्काळ दाखल झाले. त्यानंतर त्यांच्याकडून बचावकार्य सुरू करण्यात आले. घटनास्थळी पोलीस प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापनाचे अधिकारी उपस्थित आहेत. मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री चौहान यांनी मृतांच्या वारशांना 5 लाखांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार लाल पठारमध्ये पाणी पुरवठा योजनेची एक जुनी स्लॅबने बंद विहीर आहे. याला लावण्यात आलेल्या झाकणाच्या जागेतून काही मुले विहिरीत उड्या मारून पोहोत होते. गुरुवारी काही मुले त्यात पोहोत असताना एक मुलगा विहिरीत बुडाला. त्यानंतर त्या मुलाला वाचवण्यासाठी काही जणांनी शोध मोहीम हाती घेतली. त्यावेळी गावातील इतर नागरिकांनी विहिरीच्या कठड्यावर गर्दी केली होती. त्यावेळी विहिरीच्या कठड्याचा स्लॅब कोसळून 40 जण विहिरीत पडले. त्यानंतर त्याची बचाव मोहीम सुरू करण्यात आली.
Last Updated : Jul 16, 2021, 12:39 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details