गोल फिरवल्यावर वाजते ही जादूची बासरी! - नारायणपूर बासरी बातमी
रायपूर - बस्तरमधल्या नारायणपूरमध्ये अशा बासऱ्या तयार केल्या जातात ज्या वाजवण्यासाठी व्यक्तीची गरज लागत नाही. पंडीराम मंडावी आणि त्यांचा मुलगा या बासऱ्या तयार करतात. मुंबई, दिल्ली आणि विदेशात देखील या बासरीचे चाहते तयार झाले आहेत. इटली आणि रशियातील लोकसुद्धा या बासरीतून निघणाऱ्या सुरांचे प्रशंसक आहेत.