![ETV Thumbnail video thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-10290878-728-10290878-1610985646732.jpg)
VIDEO : हैदराबाद विमानतळाजवळ आढळला बिबट्या; सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद - हैदराबाद बिबट्या
हैदराबाद : तेलंगणाच्या पेड्डागोलकोंडा भागामध्ये असलेल्या हैदराबाद आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ रविवारी रात्री एक बिबट्या फिरताना दिसून आला. सीसीटीव्हीमध्ये दिसून येत आहे, की तो बिबट्या विमानतळाच्या सुरक्षा भिंतीबाहेर फिरत आहे. थोड्या वेळानंतर तो चक्क या भिंतीवरुन आत उडी मारताना दिसून येतो आहे. सध्या वन विभागाचे कर्मचारी या बिबट्याचा शोध घेत आहेत. तसेच, विमानतळाच्या आजूबाजूला राहणाऱ्या लोकांना सतर्क राहण्यास सांगितले आहे...