महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

अन् वाघाला घाबरुन चित्ता बसला झाडावर; पाहा मजेशीर व्हिडिओ.. - मध्य प्रदेश वाघ चित्ता व्हिडिओ

🎬 Watch Now: Feature Video

By

Published : Jun 20, 2021, 7:50 PM IST

भोपाळ : खरंतर जंगलाचा राजा सिंहाला म्हणतात. मात्र, जंगलात वाघाचीही काही कमी दहशत नसते. अगदी चपळ असलेला चित्ताही वाघाला घाबरुनच असतो. असाच काहीसा प्रकार मध्यप्रदेशच्या होशंगाबादमध्ये असणाऱ्या सातपुडा व्याघ्र प्रकल्पात पहायला मिळाला. याठिकाणी एका चित्त्याच्या समोर जेव्हा वाघ आला, तेव्हा भीतीने हा चित्ता चक्क झाडावरच चढून बसला. त्यानंतर किती तरी वेळ वाघ त्या झाडाखाली उभा होता. मात्र, चित्ता खाली उतरायचे नावच घेत नव्हता. सुदैवाने वाघाला दुसरी एक शिकार दिसल्यामुळे तो तिथून निघून गेला, ज्यानंतर चित्त्याने सुटकेचा निश्वास सोडला. हा सर्व प्रकार व्हिडिओमध्ये कैद झाला असून, हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे..

ABOUT THE AUTHOR

...view details