शहीद दिन : फिरोजशाह कोटलातील बैठक ते असेंब्लीतील बॉम्बस्फोटाची गोष्ट - shaheed bhagat singh death anniversary
नवी दिल्ली - चौदाव्या शतकात तुघलक वंशातील शासक फिरोजशाह तुघलकाने फिरोजशाह कोटला किल्ल्याची निर्मिती केली होती. तुघलक घराण्याचे प्रतीक म्हणून हा किल्ला ओळखला जातो. मात्र, या किल्ल्यात भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील महत्त्वपूर्ण घटना घडली होती याबाबत खूपच कमी लोकांना माहिती आहे. याच किल्ल्यात शहीद भगतसिंगांनी आणि त्यांच्या साथीदारांनी असेंब्लीतील बॉम्बस्फोटाची रणणीती आखली होती.