world social media day 2021 : जाणून घ्या सोशल मीडियाविषयी मनोरंजक माहिती!
जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात राहूनही आपण सोशल मीडियाद्वारे एकमेकांशी संपर्क साधू शकतो. फक्त संवादामध्ये नाही, तर व्यवसाय आणि जाहिरात जगातही प्रचंड क्रांती झाली आहे. 30 जून 2010 रोजी मॅशेबलच्या वतीने जागतिक सोशल मीडिया डेची सुरूवात झाली. आज ट्विटर, इंस्टाग्राम, स्नॅपचॅटसारखे प्लॅटफॉर्मही मोठ्या प्रमाणात वापरण्यात येत आहेत. दरवर्षी 30 जून रोजी 'सोशल मीडिया डे' साजरा केला जातो. या निमित्ताने सोशल मीडियाशी संबंधित मजेदार गोष्टींबद्दल जाणून घेऊया...