केरळ : विहिरीमध्ये अडकलेल्या वन्य हत्तीची सुटका - केरळ हत्ती न्यूज
विहिरीमध्ये अडकलेल्या वन्य हत्तीची सुटका करण्यात आली आहे. सुदैवाने हत्तीला गंभीर दुखापत झाली नाही. केरळच्या एर्नाकुलम जिल्ह्यात कोथमंगलम भागात ही घटना घडली. हत्ती बुधवारी गोपालकृष्णन यांच्या घराच्या आवारात असलेल्या विहिरीत पडला होता. घटनेची माहिती मिळताच वन्य अधिकाऱ्यांनी धाव घेत हत्तीची सुटका केली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गोपालकृष्णन यांनी हत्तीमुळे झालेल्या नुकसानाची भरपाई मागितली.