कारवारचं 'रॅाक गार्डन'..जिथं तुम्ही घेऊ शकता गावात राहण्याचा आनंद - Karwar's 'Rock Garden'
कारवार शहरातील हे रॉक गार्डन जिथे तुम्हाला केवळ गावातील राहणीमाणच नाही तर तिथल्या मातीचा सुंगधही मोहून टाकतो. या गार्डनमध्ये मूर्ती बवविण्यात आल्या आहेत. गावातील सु्ंदर आणि साध्या राहणीमानाचं इथं मूर्तीरुपात चित्रण करण्यात आलंय. माणसं, जनावरे, विहिर,सिंचन,पशुपालन, घरे,शेत आणि विविध समुदायाची लोक... या सगळ्या मूर्ती पाहून गावातील एकंदरित दृष्य लक्षात येत. या गार्डनमध्ये हल्लाक्की गौड़ा, मस्यपालन करणारे, सिद्दी, गुली आणि इतर समुदायातील लोकांना इथं आपण पाहू शकतो. कारवार मुख्यत: किनारपट्टीचे क्षेत्र आहे. इथला समुद्री भाग आणि निर्सगरम्य वातावरण लोकांना आपल्याकडे आकर्षित करतो. रिवर राफ्टिंगमध्ये आवड असणाऱ्या लोकांना कारवार आवडतं मात्र, गांवातील लोक, परंपराचं आकर्षण असणाऱ्यांना सुद्धा कारवारची भुरळ पडलीये. रॉक गार्डनमध्ये अनेक दुर्मिळ गावांच चित्रण केलेलं आपण पाहू शकतो आणि आपण गावात राहण्याचा अनुभव घेऊ शकतो.