अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांचे भारतीय 'कनेक्शन'
हैदराबाद - 'पिंगनाडु-थुलसेंद्रपुरम' कमला हॅरिस यांचे आजोबा पीव्ही गोपालन राहत. या गावात जाण्यासाठी तंजावरहून मन्नारगुडीकडे 45 किमी प्रवास करावा लागतो. या गावात 70 कुटुंबं राहतात. 1911 मध्ये गोपाल यांचा जन्म झाला. वयाच्या २० व्या वर्षी त्यांनी स्वातंत्र्य लढ्यात भाग घेण्यासाठी गाव सोडलं. नंतर ते एक मोठे सरकारी अधिकारी बनले. कमला हॅरिस या गोपालन यांची नात आहेत. कमला हॅरिस अमेरिकेच्या पहिल्या महिला कृष्णवर्णीय भारतीय-अमेरिकन उपराष्ट्राध्यक्ष आहेत. त्यांच्या रुपात पहिल्यांदाच एका आशियन व्यक्तीला अमेरिकन उपराष्ट्राध्यक्ष होण्याचा मान मिळाला.