हिंदू-मुस्लिम एकतेचे प्रतीक होते हे क्रांतिकारक, भगतसिंहांच्याआधी चढले फासावर - Ram Prasad Bismil
महान स्वातंत्र्य सेनानी राम प्रसाद बिस्मिल, अशफाक उल्ला खान, रोशन सिंह व राजेंद्र लाहिरी यांना आजच्याच दिवशी (19 डिसेंबर) 1927 ला इंग्रज सरकारने फाशी दिली होती. आजचा दिवस 'बलिदान दिवस' म्हणून ओळखला जातो. या तीन क्रांतिवीरांनी 'काकोरी कट' घडवून आणला आणि इंग्रजांना इशारा दिला होता. काकोरीच्या खटल्यामध्ये चार जणांनी देशासाठी बलिदान दिले. रामप्रसाद बिस्मिल व अशफाक उल्ला खान यांची दोस्ती हे स्वातंत्र्यलढ्यातील हिंदू-मुस्लीम एकतेचं प्रतिक बनले होते.