कोरोना काळानंतर अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर येत आहे - राष्ट्रपती - राष्ट्रपतींचे अभिभाषण लेटेस्ट न्यूज
नवी दिल्ली - संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू झाले आहे. परपंरेनुसार अर्थसंकल्पीय अधिवेशनाआधी राष्ट्रपतींचे अभिभाषण सुरू झाले आहे. या अभिभाषणामध्ये राष्ट्रती रामनाथ कोविंद यांनी भारतीय अर्थव्यवस्थेवर भाष्य केले. भारतीय अर्थव्यवस्था कोरोनाकाळातील लॉकडाऊनमध्ये फटका बसला होता. आता अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर येत असल्याचे राष्ट्रपतींनी म्हटलं आहे. गुंतवणुकदारांसाठी गुंतवणुकीचे आकर्षक केंद्र म्हणून भारत उदयास येत आहे, असेही ते म्हणाले.
Last Updated : Jan 29, 2021, 2:35 PM IST