पंतप्रधानांसमवेतच्या बैठकीनंतर जम्मू आणि काश्मीरच्या नेत्यांनी या दिल्या प्रतिक्रिया
नवी दिल्ली - जम्मू काश्मीरमधील सर्व राजकीय पक्षांची ऐतिहासिक अशी बैठक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर पार पडली. या बैठकीत गृहमंत्री अमित शाह यांच्यासह जम्मू आणि काश्मीरचे राज्यपाल मनोज सिन्हा उपस्थित होते. ही बैठक साडेतीन तास चालली. गुलाम नबी आझाद यांच्यासह जम्मू काश्मीरचे चार माजी मुख्यमंत्री व इतर नेते बैठकीला उपस्थित होते. सुत्राच्या माहितीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बैठकीत सर्वांकडून सूचना जाणून घेतल्या आहेत. प्रत्येकाने प्रामाणिकपणे त्यांचे मते व्यक्त केल्याने पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला. काश्मीरचे भवितव्य उज्जवल करण्यासाठी ही खुली चर्चा होती.