VIDEO: आयपीएस महेश भागवत यांच्याकडून जनतेला महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा - महेश भागवत बातमी
हैदराबाद - महाराष्ट्र दिनानिमित्त मराठमोळे आयपीएस अधिकारी महेश भागवत यांनी महाराष्ट्र दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत. महेश भागवत हे हैदराबादमधील राचाकोंडा विभागामध्ये पोलीस आयुक्तपदी कार्यरत आहेत. महाराष्ट्र दिनानिमित्त 'ईटीव्ही भारत'ने पोलीस आयुक्त भागवत यांच्यासोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी महाराष्ट्रीय नागरिकांना शुभेच्छा संदेश दिला. कोरोना संकटात एकमेकांना मदतीचा हात देण्याचे आवाहन त्यांनी जनतेला केले.