महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

ईटीव्ही भारत Exclusive : 'पद्मभूषण' सुमित्रा महाजन यांच्याशी खास बातचीत.. - Sumitra Mahajan on winning Padma Vibhushan

By

Published : Jan 26, 2021, 5:37 PM IST

भोपाळ : देशाच्या माजी लोकसभा सभापती, आणि इंदूरच्या माजी खासदार सुमित्रा महाजन यांनी पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. या पुरस्काराची घोषणा होताच, ईटीव्ही भारतने सुमित्रा महाजन यांची प्रतिक्रिया घेतली. यावेळी त्या म्हणाल्या, की एखादे काम आपण प्रामाणिकपणे करु, आणि त्या कामाची अशा प्रकारे दखल घेतली जावी हे आनंददायी आहे. आपल्या आई-वडिलांनी दिलेल्या शिकवणीमुळेच आपण हे सर्व मिळवू शकतो, असे मत त्यांनी व्यक्त केले. देशातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून ओळख असलेल्या इंदूरमधून महाजन या तब्बल आठ वेळा खासदार राहिल्या आहेत. तसेच, सलग आठ वेळा एकाच मतदारसंघातून निवडून आलेल्या त्या देशातील एकमेव महिला खासदार आहेत. पाहूयात, ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधीशी महाजन यांनी केलेली खास बातचीत...

ABOUT THE AUTHOR

...view details