भाकरी विकणाऱ्या महादेवींची प्रेरणादायी कहाणी; २०० महिलांना दिलाय रोजगार - भाकरी विकणाऱ्या महादेवींची प्रेरणादायी कहाणी
बंगळुरू - कर्नाटकचा उत्तर भाग हा विविध प्रकारच्या भाकऱ्यांसाठी प्रसिद्ध आहे. येथील महिला भाकऱ्या बनवून मिळणाऱ्या उत्पन्नावर समाधानी आहेत. ही गोष्ट आहे एका महिलेची, जिच्या निर्णयानं अनेक महिलांचं जीवन बदलून गेलंय. रिकामा खिसा आणि भुकेलं पोट माणसाला बरंच काही शिकवून जातं. या म्हणीला साजेसं ठरणारं उदाहरण म्हणजे या महिलेचं जीवन. भाकऱ्या करणाऱ्या महादेवी यांचे भाकरीनेच जीवन बदलून टाकले. विशेष म्हणजे अनेक महिलांना त्यांनी जगण्याचं साधन दिलंय. महादेवी या कर्नाटकातील कलबुर्गीच्या रहिवासी आहेत. लग्नानंतर फार कमी वेळातच त्यांच्या पतीचे निधन झाले. त्यांना आपल्या दोन मुलांसोबत जगण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला.