जगातील एकूण वाघांपैकी ७० टक्के भारतात; केंद्रीय पर्यावरण मंत्री जावडेकरांची माहिती.. - प्रकाश जावडेकर वाघांची संख्या
जगातील एकूण वाघांच्या संख्येपैकी ७० टक्के वाघ हे भारतात असल्याची माहिती केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली आहे. उद्याच्या (बुधवार) आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी दिल्लीतील राष्ट्रीय माध्यम केंद्रामध्ये देशातील वाघांबाबत आकडेवारी जाहीर केली. यामध्ये त्यांनी ही माहिती दिली. देशाला या गोष्टीचा अभिमान वाटायला हवा, असेही ते यावेळी म्हणाले. यासोबतच, देशात ३० हजारांहून अधिक हत्ती, तीन हजार एकशिंगी गेंडे आणि ५००हून अधिक सिंह असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
Last Updated : Jul 28, 2020, 9:16 PM IST