पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते आरोग्य केंद्राचे उद्घाटन - Etv Bharat live
मुंबई- कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून प्राथमिक आरोग्य केंद्रांची कमतरता पडत आहे. त्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेच्यावतीने प्रभागांमध्ये आरोग्य केंद्र सुरू करण्यात येत आहेत. उत्तर मतदार संघातील आरोग्य केंद्राचे उद्घाटन पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी खासदार गजानन कीर्तिकर, आमदार सुनील प्रभू व रवींद्र वायकर यावेळी उपस्थित होते.