भरतपूरच्या स्थापनेचा साक्षीदार 'अभेद्य लोहगड' किल्ला - भरतपूर लोहगड किल्ला व्हिडिओ
जयपूर - भरतपूर आपला इतिहास आणि विशेष करून अभेद्य लोहगड किल्ल्यासाठी प्रसिद्ध आहे. लोहगड हा असा एकमेव किल्ला आहे जो मुघल, मराठा आणि इंग्रज शासकांना जिंकता आला नाही. महाराजा सूरजमल यांनी 1743 सालातील वसंत पंचमीच्या दिवशी या किल्ल्याचा पाया रचला होता. इसवी सन 1733 मध्ये कुंवर सूरजमल यांनी खेमकरण सोगरियावर आक्रमण केले आणि फतेहगढी जिंकून घेतली. याच ठिकाणी 1743च्या वसंत पंचमीच्या मुहुर्तावर त्यांनी लोहगडाचे काम सुरू केले गेले. 101 ब्राह्मणांच्या उपस्थितीत दुर्गा सप्तशतीच्या मंत्रोच्चारात भरतपूरची स्थापना झाली.