महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Sanjay Raut On Delhi FIR : मी भावना दुखावण्याचे बोललोच नाही -संजय राऊत - मी जे काही बोललो ते चुकीचं काहीच नाही

By

Published : Dec 13, 2021, 12:02 PM IST

Updated : Dec 13, 2021, 12:48 PM IST

संजय राऊत ( Sanjay Raut On FIR In Delhi ) यांनी स्पष्ट केले आहे की, मी जे काही बोललो ते चुकीचं काहीच नाही. ( Police Complaint Against Shiv Sena MP Raut ) जे सरकारमान्य,साहित्यिक मान्यता प्राप्त शब्दकोश आहे, पहा त्यात मूर्ख, बुद्धू असा अर्थ आहे. गृह खाते जे केंद्राच्या अखत्यारीत्या येते तेथे माझ्यावर गुन्हा दाखल केला आहे. हे शिवसेनेला बदनाम करण्याचे षडयंत्र (Conspiracy to discredit Shiv Sena) आहे. ही शिवसेना आहे हे मी सांगतो. मी भावना दुखावण्याचे बोललोच नाही, माझ्याकडे ईडी, इन्कम टॅक्स,सीबीआय यांना पाठवू शकले नाही. म्हणून असे केले असावे महापौर किशोरी पेडणेकर यांनी गुन्हा दाखल केला म्हणून माझ्यावर गुन्हा दाखल केला असावा. गोवा निवडणुकीसंदर्भात बोलताना त्यांनी सांगितलेकी, अजून वेळ आहे महाविकास आघाडीबाबत चर्चा करू त्या राज्यातील कार्यकर्त्यांशी चर्चा करू. राजकारण चंचल आहे, मोदी हे 2014 मध्ये पंतप्रधान होतील हे कोणाला वाटलं नव्हतं. लोकशाही चंचल आहे.देशातील जनता हुशार आहे.
Last Updated : Dec 13, 2021, 12:48 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details