बालाकोट एअर स्ट्राईकला दोन वर्ष पूर्ण; भारतीय वायुसेनेने केला एअर स्ट्राईकचा अभ्यास - balakot airstrike news
नवी दिल्ली - 26 फेब्रुवारी रोजी, भारतीय हवाई दलाने बालाकोटमधील अतिरेकी तळावर हवाई हल्ले चढवले. या हवाई हल्ल्याला दोन वर्ष पूर्ण झाली आहेत. बालाकोट हवाई हल्ल्याच्या दुसर्या वर्धापन दिनानिमित्त भारतीय वायुसेनेने एअर स्ट्राईकचा अभ्यास केला. या अभ्यासात बालाकोट हवाई हल्ला करणाऱया पथकातील सदस्यांनी सहभाग घेतला होता. वायूसेनेने या अभ्यासाचा व्हिडिओ जारी केला आहे.