ऐतिहासिक पानिपत शहर बनलंय देशाचं 'टेक्स्टाइल हब' - पानिपत टेक्स्टाईल हब
राजधानी दिल्लीपासून ९० किलोमीटरवर वसलेले पानिपत हे एक ऐतिहासिक शहर आहे. शहर इतिहासातील कित्येक मोठ्या युद्धांचे साक्षीदार राहिले आहे. पानिपतमध्ये झालेल्या बाबर, हुमायूं आणि इब्राहिम लोधी या योद्ध्यांच्या लढायांनी देशाचा इतिहास बदलला. येथे असलेल्या जुन्या वास्तू आजही पानिपतच्या महान इतिहासाची कथा सांगतात. खूप मोठी ऐतिहासिक पार्श्वभूमी असेलेले हे शहर आता वेगळ्या कारणांसाठी प्रसिद्ध आहे. पानिपत हा जिल्हा टेक्स्टाइल हब झाला असून दरवर्षी जगभरात तब्बल साडेसात हजार कोटी रुपयांच्या हँडलूम वस्तूंची निर्यात केली जाते. पाहुयात हा रिपोर्ट...