टाकाऊतून टिकाऊ : हिमाचलमधील कल्पना ठाकूर यांचा अभिनव उपक्रम..
शिमला - हिमाचल प्रदेशच्या कुल्लू-मनालीमध्ये राहणाऱ्या कल्पना ठाकूर यांनी प्लास्टिकचा पुनर्वापर करण्यासाठी एक अभिनव मार्ग शोधून काढला आहे. कल्पना या प्लास्टिक कचऱ्याचा वापर करुन, त्याद्वारे विविध शोभेच्या वस्तू तयार करतात. यासोबतच, त्या स्थानिक लोकांमध्ये प्लास्टिक विरोधी जनजागृतीही करतात. कल्पना यांच्या या उपक्रमाचे सर्वच स्तरांमधून कौतुक केले जात आहे. पाहूया ईटीव्ही भारताचा हा विशेष रिपोर्ट..