हेमंत सोरेन झारखंडचे ११ वे मुख्यमंत्री; पहा शपथविधी सोहळा
'झारखंड मुक्ती मोर्चा'चे अध्यक्ष हेमंत सोरेन यांनी झारखंड राज्याचे ११ वे मुख्यमंत्री म्हणून आज (रविवारी) शपथ घेतली. राज्यपाल द्रौपदी मुर्मू यांनी सोरेन यांना शपथ दिली. सोरेन सरकारमध्ये तीन आमदारांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली.