VIDEO : आठ तास वाट बघूनही आली नाही रुग्णवाहिका; शेवटी हातगाडीवर नेले रुग्णालयात - भोपाळ हातगाडी मुलगी
भोपाळ : मध्य प्रदेशच्या रीवामध्ये पुन्हा एकदा वैद्यकीय व्यवस्थेचा गलथानपणा समोर आला आहे. आठ तास वाट पाहूनही रुग्णावाहिका आली नसल्याने, एका वडिलांनी आपल्या मुलीला दवाखान्यात नेण्यासाठी चक्क हातगाडीचा वापर केला. आपल्या घराच्या इमारतीवरुन ही मुलगी खाली पडली होती. हे बापलेक राहत असलेला परिसर कन्टेन्मेंट झोन होता. त्यामुळे, त्यांना रस्त्यावर लावलेली जाळी तोडून, मग हातगाडी बाहेर न्यावी लागली. सुदैवाने ही मुलगी वेळेत दवाखान्यात पोहोचली आणि तिच्यावर उपचार सुरू करण्यात आले. सध्या तिची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, यामुळे प्रशासनावरील लोकांनी विश्वास ठेवावा की नाही असा प्रश्न उपस्थित होतो आहे..