महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

हेड कॉन्स्टेबल सुखबीरने 'सेवा, सुरक्षा और सहयोग' ला प्रत्यक्षात उतरवले - ambala police beggar viral video

By

Published : May 27, 2021, 1:54 PM IST

अंबाला - छावनीतील महेश नगर पोलीस स्टेशनचा व्हिडीओ सध्या वायरल होत आहे. या व्हिडीओत पोलिसाचा मोठेपणा बघायला मिळत आहे. अंबाला छावनीच्या महेश नगर पोलीस स्टेशन मध्ये अचानक एक वृध्द व्यक्ति आला. त्याची परिस्थिती बघून कोणालाही हळहळ वाटेल, असा तो व्यक्ति होता. त्याच्याकडे बघून हेड कॉन्स्टेबल सुखबीर यांनी मोठेपणा दाखवत त्या वृध्दाचे व्यवस्थित केस कापले, नख कापले, त्यानंतर त्याला पोलीस स्टेशन मध्येच अंघोळ घातली. त्यानंतर त्याला जेवायला घेऊन गेले. सुखबीर यांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. हेड कॉन्स्टेबल सुखबीर यांनी हरियाणा पोलीस चे ब्रीदवाक्य, 'सेवा, सुरक्षा और सहयोग' ला प्रत्यक्षात उतरवले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details