प्लास्टिकमुक्त गाव करणारी केरळमधील 'हरित कर्म सेना'.. - Perinad Harith Karma Sena
तिरूवअनंतपुरम - केरळच्या कोल्लम जिल्ह्यातील पेरिनाड गावात राहणाऱ्या चाळीस महिलांनी, आपले गाव हे प्लास्टिक मुक्त करण्याचा विडा उचलला आहे.. त्यांच्या 'हरित कर्म सेने'ने केलेले कचरा व्यवस्थापन आणि पर्यावरण संरक्षणासाठी घेतलेले निर्णय पाहून, राष्ट्रीय हरित लवादने त्यांना एक आदर्श गाव म्हणून घोषित केले आहे. पेरिनाड गावाने आपल्या आजूबाजूच्या गावांनाच नाही, तर संपूर्ण भारताला हे दाखवून दिले आहे, की प्लास्टिकच्या कचऱ्याचे नियोजन कशाप्रकारे केले पाहिजे..