शारीरिक दिव्यांग तरीही, 'ती'ची कला पोहचलीये साता समुद्रापार - मीना चित्रकला
कर्नाटकच्या शिवमोग्गा जिल्ह्यातील होसलाई गावात राहणारी मीना आपल्या पायावर उभीही राहू शकत नाही. मस्कुलर डिस्ट्रोफी आजारामुळं तिने आपल्या पायातील शक्ती गमावली आहे. मात्र, तिचा हा दिव्यांगपणा तिच्या प्रतिभेच्या आड येऊ शकला नाही. लहानपणापासूनच मीनाला आभ्यासासोबत शिल्पकलेची, चित्रकलेची आवड होती. आणि याच आवडीला मीनाने व्यवसायरुपात उतरवले आहे. आज मीना सगळ्यासांठी प्रेरणास्त्रात बनली आहे. तिची चित्रे केवळ भारतातच नाही, तर विदेशातही लोकप्रिय आहेत.
Last Updated : Apr 6, 2021, 6:20 PM IST