पर्यटकांवर झालेल्या हल्ल्यानंतर भावूक झाले होते गुलाम नबी आझाद, मागितली माफी; पाहा व्हिडिओ... - गुलाम नबी आझाद व्हिडिओ
नवी दिल्ली : राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांचा सदनाच्या सदस्यत्वाचा कार्यकाळ संपुष्टात येत असल्याने मंगळवारी सदनाकडून त्यांना निरोप देण्यात आला. यावेळी गुलाम नबी आझाद जम्मु-काश्मीरचे मुख्यमंत्री असताना घडलेल्या प्रसंगाची आठवण सांगताना पंतप्रधान मोदी भावूक झाले होते. आझाद मुख्यमंत्री होते तेव्हा गुजरातमधील पर्यटकांवर काश्मीरात हल्ला झाला होता. तेव्हा सर्वप्रथम मला गुलाम नबी आझाद यांचा फोन आला. फक्त माहिती देण्यासाठी त्यांनी फोन नाही केला. तेव्हा त्यांचे अश्रू थांबत नव्हते. आपल्या कुटुंबीयांची काळजी घ्यावी तशीच काळजी त्यांनी या नागरिकांविषयी घेतली. ही आठवण सांगताना मोदी भावूक झाले. गुलाम नबी आझादांच्या त्या प्रसंगाचा हा व्हिडिओ...
Last Updated : Feb 9, 2021, 5:11 PM IST