शेतकऱ्यांच्या अन्नत्याग आंदोलनाला 'आप'चा पाठिंबा - गोपाल राय आप नेते
दिल्लीच्या सिंघू सीमेवर केंद्रीय कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीवर शेतकरी ठाम आहेत. मात्र, सरकार आणि आंदोलकांत तोडगा निघाला नाही. उद्या सर्व शेतकरी नेते अन्नत्याग आंदोलन करणार आहेत. त्यास आम आदमी पक्षाने पाठिंबा दिला आहे. सकाळी दहा वाजेपासून सायंकाळी पाच वाजेपर्यंत पक्षाच्या नेते आणि कार्यकर्त्यांकडून अन्नत्याग आंदोलन करण्यात येणार आहे.