हरियाणातील गोहानाच्या प्रसिद्ध 'ट्रॉली' ला राज्यांची पहिली पसंती - प्रसिद्ध ट्रॅक्टर 'ट्रॉली'
गोहाना (हरियाणा) - गोहानाची जिलेबी आणि हुक्काच नाही, तर येथिल ट्रॉली देखील देशभरात प्रसिध्द आहे. गोहानामध्ये तयार होणाऱ्या ट्रॉलींची मागणी फक्त हरियाणामध्ये नव्हे, तर राजस्थान, उत्तर प्रदेश, छत्तीसगड आणि देशभरातील इतरही राज्यात आहे. तब्बल 40 वर्षांपासून गोहानाची ट्रॉली इतर राज्यांचीही पहिली पसंती ठरली आहे.