VIDEO लखनौमध्ये तरुणीची व्हॅन चालकाला मारहाण, मोबाईलही फोडला!
लखनौ - उत्तर प्रदेशमध्ये गुन्हेमुक्त करण्याचा दावा करणाऱ्या मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची डोकेदुखी वाढली आहे. लखनौमधील कृष्णानगर येथे 31 जुलैला एका तरुणीने व्हॅन चालकाला 20 मिनिटे मारहाण केली. यावेळी घटनास्थळी वाहतूक पोलीसही उपस्थित होता. तरुणीने चालकाचा मोबाईल फोनही तोडला आहे. तरुणाला वाचविण्याचा प्रयत्न करणाऱ्यालाही तरुणीने कानशिलात लगावली आहे. सीसीटीव्हीमध्ये चालकाची चूक नसल्याचे आढळले आहे. त्या तरुणीवर पोलीस कारवाई करणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.