वयाच्या पन्नाशीत दोन विहिरी खोदणारी 'कलियुगातील भागीरथ' - सिरसी गौरी नाइक विहिरी बातमी
बंगळुरू - आपल्या सर्वांना पुराणातील भागीरथाची गोष्ट माहिती आहे. त्यांनी गंगेला पृथ्वीवर आणले अशी ही गोष्ट आहे. सिरसीतल्या गौरी नाइक या ज्येष्ठ महिलेला कलियुगातील भागीरथ म्हटले जात आहे. सुपारीच्या झाडांना जिवंत ठेवण्यासाठी गौरी चंद्रशेखर नाइक यांनी वयाच्या पन्नाशीत कुणाचीही मदत न घेता आपल्या घराजवळ दोन विहिरी खोदल्या आहेत. चार ते पाच महिन्यांच्या कालावधीत त्यांनी कठोर परिश्रम घेऊन सहा आणि सात परसाच्या दोन विहिरी खोदल्या. खोदकामातून निघणारी माती सुद्धा त्यांनी स्वत:च दुसऱ्या ठिकाणी नेऊन टाकली. त्यांच्या या कष्टांमुळेच सुपारीच्या झाडांना आणि गावाला पुरेसे पाणी उपलब्ध झाले आहे.